Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमुळशीवनविभाग पुणे, वनपरीक्षक कार्यालय पौड व वनसंरक्षण समिती तर्फे पेठशहापूर जि. प....

वनविभाग पुणे, वनपरीक्षक कार्यालय पौड व वनसंरक्षण समिती तर्फे पेठशहापूर जि. प. शाळेला संगणक व शालेय साहित्य वाटप…

पौड (प्रतिनिधी): वनविभाग पूणे तरफे वनपरीक्षक कार्यालय पौड व वनसंरक्षन समिती पेठशहापूर यांच्या मार्फत शिक्षणासाठी काळाची गरज लक्षात घेत पेठशहापूर येथील जि.प.शाळा शाळेला कॉम्पुटर व शालेय ऊपयोगास येणारे अनेक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी वनसमिती आध्यक्ष मा. सरपंच गणपत मेंगडे , आंबवणे वनपाल एस.बी.आहिराव ,अंबवणे वनरक्षक योगेश जाधव ,विसाघर वनरक्षक सोमनाथ केंद्र ,मा. उपसरपंच देविदास मेंगडे ,स्थानिक ग्रामस्थ राजू कराळे ,दत्तात्र मेंगडे ,लक्षमन मेंगडे ,पिंटू हिलम ,योगेश पवार ,करण पवार, स्वप्निल हिलम, रमेश हिलम ,सूरेश वाघमारे, आदि जण उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना काटे मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर उप शिक्षिका श्री.म.हेमलता मोरे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करून धन्यवाद दिले .
- Advertisment -

You cannot copy content of this page