Sunday, December 8, 2024
Homeपुणेतळेगाववन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून 43 बागळ्यांच्या पिल्लांना जीवनदान…

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून 43 बागळ्यांच्या पिल्लांना जीवनदान…

मावळ(प्रतिनिधी):वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून तळेगांव दाभाडे येथील जिजामाता चौका जवळ कोसळलेल्या बाबळीच्या झाडावरून तब्बल 43 बागळ्यांच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दि.23 रोजी तळेगाव दाभाडे उद्यान विभागाचे प्रमुख सिद्धेश्वर महाजन यांनी फोन केला की जिजामाता चौकाजवळ जितेंद्र कदम यांच्या घरावर एक बाभळीचे झाड पडले आहे आणि त्या झाडावर बरीच पक्ष्यांची घरटी असून त्यामध्ये अनेक पक्षांची पिल्लं असल्याची खबर मिळताच काही वेळातच संस्थेचे सदस्य जिगर सोळंकी तिथे पोहचले व त्यांनी पाहीले की हे सर्व बगळे आहेत. व झाड पडल्याने त्यांचे घर झाले नष्ट झाले असल्याची निलेश गराडे यांना माहिती देताच संस्थेचे सहकारी किरण मोकाशी, श्रेयस कांबळे, प्रियांका शर्मा, जिगर सोलंकी, विकी दौंडकर, गणेश निसाळ, गणेश ढोरे,भास्कर माळी, अनिश गराडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहचून बेघर झालेल्या बगळ्यांच्या पिल्लांना ऐक ऐक करुन पकडुन बास्केट मध्ये ठेऊन 43 पिल्लांना जीवदान दिले. तर तीन पिल्लं मरण पावली.
त्या रेस्क्यू केलेल्या बगळ्याच्या 43 पिल्लांना वन विभाग पुणे ACF आशुतोष शेंडगे व वडगांव मावळचे रेंज ॲाफीसर हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील रेस्कु चारीटेबल ट्रस्ट यांना बोलावून पुढील ऊपचारासाठी रेस्कु सेंटर भुगांव येथे पाठवीण्यात आले आहे.

वनपाल एन.के.हिरेमट, वनरक्षक योगेश कोकाटे,वन सेवक किसन गावडे व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य उपस्थित राहून सगळे पक्षी सुखरूप रेस्क्यू टीमच्या ताब्यात देऊन पुढील उपचारा साठी रेस्क्यू सेंटर भुगांव येथे पाठवण्यात आले असून कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत अढळळ्यास जवळ पासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागाला संपर्क (1926) यावर संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे 9822555004 आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page