Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळावरसोलीचे संजय खांडेभरड यांना जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

वरसोलीचे संजय खांडेभरड यांना जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

लोणावळा : वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवीण्यात आले.अहमदनगर येथे रविवार दि.10 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
संजय खांडेभरड हे वरसोली गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. मागील पंचवार्षिक काळात हे गावचे उपसरपंच होते. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकिक मिळविला आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सरपंच पदाच्या काळात त्यांनी गावात केलेली विकासकामे याची दखल घेत सरपंच सेवा संघाकडून त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित संजय पवार, राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page