
लोणावळा (प्रतिनिधी) : वरसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नलिनी दत्ता खांडेभरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच संजय खांडेभरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वरसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत नलिनी खांडेभरड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड सरपंच संजय खांडेभरड यांनी घोषित केली.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे, नारायण कुटे, रजनी कुटे, मंदा पाटेकर, मीना शिद, सीता ठोंबरे, राहुल सुतार, विजय महाडिक यांच्यासह माजी पदाधिकारी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.