Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळावरसोली टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांची जनजागृती…

वरसोली टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांची जनजागृती…

लोणावळा (प्रतिनिधी): रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत महामार्ग पोलिसांकडून वरसोली टोल नाका येथे आज जनजागृती करण्यात आली.
महामार्गावर अनेक अपघातांच्या बातम्या आपण पाहतो आहे.अनेक जण रस्ता अपघातात आपला जीव गमावतो.जीव गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला किती यातना सोसाव्या लागतात याचे भान ठेऊन महामार्ग पोलीस प्रशासनाने ज्या सूचना दिल्यात त्याचे पालन करावे. त्यानुसार मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकी वरून प्रवास करताना डोक्यात हेल्मेट असणे गरजेचे आहे तसेच अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊ नये याबाबतच्या सूचना देत महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ गायकवाड व त्यांच्या टीमने वरसोली टोल नाका येथे दुचाकी स्वारांना रोखून जनजागृती केली.यावेळी वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांची मात्र धांदल उडाली होती.
परंतु यावेळी फक्त सूचना देत जनजागृती करण्यात आली तसेच सर्व जण वाहतूक नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केली.
- Advertisment -