लोणावळा (प्रतिनिधी): वरसोली येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा मित्रांमधील दोघांचा दगडाच्या खाणीत बुडून मृत्यू तर एका तरुणीला वाचविण्यात स्थानिकांना यश आले.
ही घटना काल शनिवार दि.8 रोजी दुपारच्या सुमारास सन पाम सोसायटी जवळ घडली.प्रियांक पानचंद व्होरा (35, पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (35, घाटकोपर, मुंबई) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत तर एका तरुणीला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार एकूण 6 जण लोणावळा शहरात पर्यटनासाठी आले होते.सर्वजण एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये कामाला होते. त्यांनी वरसोली याठिकाणी सन पाम या सोसायटीत भाड्याने बंगला घेतला. सायंकाळी ते सर्व बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी उतरले. त्याठिकाणी त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एका तरुणीला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे किशोर पवार हे करत आहेत.