Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळावरसोली येथील महिला अस्मिता भवनाचे उदघाटन आमदार शेळके यांच्या हस्ते संपन्न…

वरसोली येथील महिला अस्मिता भवनाचे उदघाटन आमदार शेळके यांच्या हस्ते संपन्न…

लोणावळा : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वरसोली मावळ येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि ‘महिला अस्मिता भवन’ उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत थाटा माटात संपन्न झाला.
वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. यापुढील काळात देखील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन देत,दैनंदिन जीवनात महिला-भगिनी विविध भूमिका सहजतेने पार पाडत असतात. आपल्या कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग व्यवसायात महिला अग्रेसर होताना आपण पाहतो. त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करत आहे.कौशल्य, व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचे कार्यक्रम यशस्वी करत असताना महिलांसाठी हक्काचे अस्मिता भवन उपलब्ध करून देण्यात आले आहे.महिला सक्षमीकरनासाठी निश्चितच लाभ होईल,’ असे आमदार सुनील शेळके म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, पंढरीनाथ ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, विष्णुमामा गायखे, सरपंच संजय खांडेभरड, कैलास हुलावळे, किरण हुलावळे, बाळासाहेब येवले, शाम विकारी, गणेश देशमुख,अरविंद बालगुडे, अमोल केदारी, उपसरपंच नलिनी खांडेभरड, ग्रामसेवक दिपक शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य, महिला-भगिनी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page