if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई करत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान दुचाकीवर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १५.१२८ किलो गांजा व मोटरसायकल असा एकूण १.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, श्री. सत्यसाई कार्तिक (सहायक पोलीस अधीक्षक) यांना गोपनीय माहिती मिळाली की, MH20 GT 0752 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर दोन इसम संभाजीनगरहून गांजा विक्रीसाठी मुंबईकडे जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पंचासह वरसोली टोलनाका येथे पहाटे नाकाबंदी केली असता, संशयित दुचाकी हद्दीत दाखल झाली.
पोलिसांनी तातडीने दुचाकी अडवून तपासणी केली असता, त्यावर अक्षय गोपीनाथ जाधव (२५) आणि प्रल्हाद आसाराम जाधव (३४, दोघे रा. आसेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) असे दोघे आढळले. त्यांच्याकडील बॅगेची झडती घेतली असता ६०,५१२ रुपये किमतीचा १५.१२८ किलो गांजा आढळून आला.
सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गांजा तस्करांविरोधात ही मोठी कारवाई केली.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४/२०२५, NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii), तसेच BNS ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण १,६०,५१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.