वलवण मस्जिदचा ताबा कोणालाही घेता येणार नाही,सर्व पक्षीय व स्थानिक मुस्लिम समाजाचे आवाहन….

0
635

लोणावळा दि.10 : लोणावळा वलवण गावातील मस्जिदच्या जागेचा ताबा वक्फ ट्रिब्युनल कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कोणालाही घेऊ देणार नाही असे आवाहन लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष तसेच स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले.

त्यावेळी हाजी शब्बीर शेख, सुरेखा जाधव (नगराध्यक्षा लो. न. पा.), आरोही तळेगावकर ( उपनगराध्यक्षा लो. न. पा.), श्रीधर पुजारी ( माजी उपनगराध्यक्ष ),शादान चौधरी (पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटक ), विलास बडेकर (काँग्रेस शहराध्यक्ष लोणावळा शहर ), शामराव पाळेकर, निखिल कवीश्वर, बाळासाहेब जाधव, सुनील इंगुळकर, स्वप्नील पाळेकर,जीवन गायकवाड, नारायण पाळेकर, दिलीप दामोदरे, सुधीर शिर्के, मुकेश परमार, हाजी जाबीर सय्यद, हाजी अमजद खान, हाजी अहमद शेख, हाजी हुसेन शेख, व सलीम खान इत्यादी मान्यवरांबरोबर पत्रकार मंडळी उपस्थित होते.

सदरची जागा ही इनामी असून काही मुंबईकर मंडळी त्यावर आपला हक्क दाखवून ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ह्या जागेवर वक्फ ट्रिब्युनल कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ताबा दिला जाईल अथवा वक्फ ट्रिब्युनल कोर्टाचा निकाल येईपर्यंत कोणालाही वलवण मस्जिदचा ताबा घेऊ देणार नाही असे आवाहन यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व स्थानिक मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आले.