Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळावलवण येथे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात..

वलवण येथे महामार्गावर तीन वाहनांचा अपघात..

लोणावळा दि.12: लोणावळा राष्ट्रीय महामार्ग वलवण येथील हॉटेल रेम्बो समोर तीन वाहनांचा अपघात. आज दुपारी 12 वा. च्या सुमारास आय 10 कार क्र. MH 12 KJ 7102, स्वीफ्ट कार क्र. MH 04 KD 8544 व मालवाहू टेम्पो क्र. MH 14 DM 419 ह्या वाहनांमध्ये हा अपघात झाला.

अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन जन जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.टेम्पोला कारची जोरदार धडक बसल्याने टेम्पो रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली होती.

पोलीस व स्थानिकांच्या मदतीने अपघात ग्रस्त वाहनांना हलविण्यात आले व महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच सुनील अण्णा शेळके प्रणित मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटना स्थळी पोहोचली परंतु रुग्ण वाहिका येण्यापूर्वीच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -