वांद्रे ग्रामपंचायत मधील नागरिकांना दिली कोरोनाची लस,६० नागरिकांनी घेतला लाभ…

0
200


प्रतिनिधि- दत्तात्रय शेडगेे.


मुळशी.सद्य सगळी कडे कोरोना व्हायरस ने हाहाकार माजवला असून आता भारतात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे, सगळीकडे कोरोना लसीचे वाटप चालू असून मुळशी तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतही ही लस पोचली असून आज वांद्रे ग्रामपंचायत मधील ४० वर्षापेक्षा पुढील नागरिकांना वांद्रे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाची लस देण्यात आली.

ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवणे येथे देण्यात आली.तर यावेळी वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील ६० लोकांना कोरोनाची लस देण्यात आली कोरोनाची लस देण्यासाठी सदाशिव साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले.


यावेळीं आंबवणे प्रथिमक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, सह अधिकारी ,वांद्रे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच दीपाली विनायक कोकरे, सदस्य विशाल पडवळ, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोकरे, तंटा मुक्ती अध्यक्ष सदाशिव साळुंखे ,आदीसह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.