if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
वाकसई मावळ : शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमे अंतर्गत आज वाकसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वाकसई चाळ, संत तुकाराम नगर याठिकाणच्या 756 कुटुंबातील 4224 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती ग्रामसेवक जगताप यांनी दिली.
मावळचे आमदार सुनील शेळके, प्रांत संदेश शिर्के, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य तपासणी मोहीम संपूर्ण मावळातील वेगवेगळ्या गावात राबविण्यात येत आहे.त्याच प्रमाणे आज वाकसई ग्रामपंचायत हद्दीत ही आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. ह्या मोहिमेसाठी आज दिवस भर येथील ग्रामस्थांनी वाकसई फाटा येथील सर्व उद्योग धंदे, दुकान व्यवसाय बंद ठेऊन सहकार्य करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सर्वेक्षण दरम्यान झोनल ऑफिसर म्हणून शालिनी ढवळे यांनी काम पाहिले. तर शिक्षक, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या 16 टिम ह्या मोहिमेत सक्रिय होत्या. स्वयंसेवकांच्या ह्या 16 टिमला वेगवेगळे परिसर तपासणी करण्यासाठी देण्यात आले होते. नियुक्त स्वयंसेवकांनी आपले काम चोख पार पाडत ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. त्यावेळी थर्मामीटरच्या साहाय्याने तापमान तपासण्यात आले, ऑक्सिमीटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. तसेच ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा येणे अशा प्रकारचा कोणाला त्रास आहे का याची नोंद करण्यात आली.