पुणे : महाराष्ट्र राज्य अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व मेरी माता हायस्कूल म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योग क्रीडा स्पर्धेत वाकसई मावळ येथील लक्ष महादेव भवर हा प्रथम आला असून त्याची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून 23 ऑगस्ट रोजी आयोजित खंडाळा तालुका योगा स्पर्धेमध्ये वाकसई मावळ येथील लक्ष महादेव भवर याने प्रथम क्रमांक पटकावीत जिल्हास्तरीय स्पर्धेत भरारी घेतली होती.
या जिल्हास्तरीय योगा क्रीडा स्पर्धा सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी मेरी माता हायस्कूल म्हसवड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यातील 11तालुक्यातील जवळपास 100 शाळांनी सहभाग नोदविला होता. त्यामध्ये समता माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,पाडेगाव ता. खंडाळा येथील 19 वर्ष वयोगटात.लक्ष महादेव भवर इ 12 वी याची रिदमिक योगा तर 17 वर्ष वयोगटात अनमोल महादेव साळवे इ 7 वी याची अर्टिस्टिक योगा या प्रकारात दोघांनीही प्रथम क्रमांकाने प्राविण्य मिळवत शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे
त्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्री. चैत्राली खिलारे मॅडम , सन्माननीय सचिव व खंबीर नेतृत्व श्री पवन सूर्यवंशी साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा श्री.विमल सूर्यवंशी मॅडम व इतर पदाधिकरी यांनी तसेच प्र.मुख्याध्यापक श्री माने सर, प्र.प्राचार्य श्री बिजले सर, पर्यवेक्षक श्री नलवडे सर, सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन करणारे.योगा शिक्षक श्री वाघमारे मुकेश सरांचेही अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांची 7 व 8 ऑक्टोबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.