Monday, July 15, 2024
Homeपुणेमावळवाकसई येथे एका 40 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.....

वाकसई येथे एका 40 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या…..

वाकसई मावळ : मावळातील वाकसई गावच्या हद्दीत एका 40 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 13 रोजी घडली. मयत कांता शंकर आरेकर (वय 40) या महिलेनी तिच्या वाकसई येथील राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 13 रोजी सकाळी 11: 30 वा. सुमारास घडली सदर घटनेची वार्ता कळताच संपूर्ण वाकसई गावात खळबळ उडाली आहे.

कांता हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने “एका चाळीस वर्षीय महिलेच्या आत्महत्या मागचे कारण काय असेल “ह्या चर्चेला गावात उधाण आले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विजय राहतेकर हे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page