वाकसई येथे भरधाव वाहनाच्या धडकेने 65 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी….

0
68

लोणावळा दि.14: सदापूर फाटा वाकसई येथे भरधाव टँकरच्या धडकेने 65 वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना दि.10 रोजी सायंकाळी 8:15 वा. च्या सुमारास घडली.

सत्तू सुदाम डोळस ( वय 65, रा. कार्ला, मावळ ) हा त्याच्या मुला समवेत सदापूर फाटा वाकसई येथे मुंबई पुणे महामार्गाच्या कडेला उभा असताना टँकर क्रमांक एम एच 12 एफ झेड 4102 हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना धडक लागल्याने सत्तू डोळस यांना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना ऍम्ब्युलन्सच्या साहाय्याने पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सदर वाहनाची सहनिशा करत असताना सदर वाहन हे डेला रिसॉर्ट येथील पाण्याचा टँकर असल्याचे लक्षात आले त्या संदर्भात पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली टँकर चालक अशोक पंडित सांगळे (रा. इंदिरा नगर, लोणावळा ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.