वाकसई (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे कार्तिकी एकादशी निमित्त पायी जाणाऱ्या नारंगी खालापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्याचे संत तुकाराम नगर वाकसई ॐ साई मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्तिकी एकादशी निमित्त रायगड येथून लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन शेकडो पायी दिंड्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी घेऊन आळंदी येथे प्रस्थान करत असतात.
आळंदीची कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला गुरूवार दि.17 पासून सुरूवात होत आहे . आज बुधवार दि.16 रोजी संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी पालखी सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचे वाकसई चाळ संत तुकाराम नगर येथील रहिवासी व ॐ साई मित्र मंडळाच्या वतीने भोजन व स्वागताचे आयोजन करण्यात आले.यावेळी परिसरातील महिला मंडळी व सांप्रदायिक परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.