वाघेश्वरचा बबन झोरे याची आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड..

0
196


खोपोली- दत्तात्रय शेडगे.


खालापुर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या बबन झोरे याची आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या बबन झोरे भारत सरकार कडून झारखंड येथे चालू असलेल्या ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश मध्ये असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या बबन झोरे यांनी २ सुवर्ण पदक मिळवले आहेत.मात्र त्याची आता आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत निवड झाली असून तो आता भारताचे नेतृत्व करणार आहे.