वाघेश्वरचा बबन झोरे याने पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकाविला..

0
176


४ गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्राचे नाव केले उज्वल..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या कु बबन बाबू झोरे याने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस यामध्ये ज्यनिअर आणि सिनिअर या ५९ किलो वजन गटांमध्ये एकूण ४ गोल्ड मेडल जिंकून देशात प्रथम क्रमांक मिळवला असून महाराष्ट्रातही प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर या स्पर्धेतील स्ट्रॉंग मॅन पुरस्कार सुद्धा आपल्या नावावर कोरला आहे.


ह्या स्पर्धा २४ जानेवारी रोजी न्यू दिल्ली येथे पार पडल्या , बबन झोरे हा कर्जत येथील नामांकित अश्या काका फिटनेस सेंटर मध्ये प्रशिक्षण घेत असून यापूर्वीही बबन ने अनेक पदके मिळवले आहेत.


न्यू दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बबन बाबू झोरे यांनी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्रात नेतृत्व केले असून त्याने महाराष्ट्राला ४ गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.बबन बाबू झोरे याची घरची परिस्थिती अतिशय बिकट असून त्याने जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर हे यश मिळवले असून रायगड जिल्ह्यातुन सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे,त्याने आई वडील, शिक्षकासह गावाचे नाव उंचावले आहे.