वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी ह .भ .प . विलास हुंडारे..

0
121

खोपोली- दत्तात्रय शेडगे

अखिल वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी ह .भ.प विलास लक्ष्मण हुंडारे यांची नुकतीच निवड करण्यात आली,महाराष्ट्र राज्याचे अखिल वारकरी संघाचे अध्यक्ष ह. भ. प. मच्छीन्द्र महाराज धानेपकर पाटील व पुणे जिल्हा अध्यक्ष हभप यशवंत महाराज फाले यांनी तत्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची अखिल वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी निवड केली.
मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायत हद्दीतील देवघर येथे राहणारे तसेच वारकरी संप्रदाय क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून त्यांनी उत्कृष्ट गायक, समाजात नेहमी अग्रेसर राहून गोर गरिबांच्या अडचणी सोडण्यासाठी आजही त्यांच्या प्रयत्न चालू आहे, तसेच त्यांचे वडील लक्ष्मण हुंडारे हे गेल्या अनेक वर्षोनुवर्षे वारकरी क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांचाच वारसा पुढे चालवत विलास हुंडारे हे वारकरी क्षेत्रात उत्कृष्ट गायक, भजन, करीत आहेत,ह भ प विलास महाराज हुंडारे यांच्या कामाची दखल वारकरी संघाने घेतली असून त्यांची अखिल वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्याची निवड होताच सर्वच क्षेत्रातुन त्याचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.