
लोणावळा (प्रतिनिधी) : विघ्नहर्ता क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुल पीच अंडर 23 टेनिस क्रिकेट स्पर्धेला खेळाडू व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या स्पर्धेत मावळ, मुळशी व पुणे येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.सलग तीन दिवस रंगलेली स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
विघ्नहर्ता क्रिकेट क्लबचे संस्थापक शुभम गायकवाड यांनी या स्पर्धेचे उत्तम आयोजन केले होते.या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 7000 रोख व चषक खंडू बोभाटे, द्वितीय पारितोषिक 5000 रोख व चषक केतन गायकवाड तर तृतीय पारितोषिक 3000 रोख व चषक सुदिन उजगरे तसेच चतुर्थ पारितोषिक 3000 रोख व चषक निरंजन कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.स्पर्धेसाठी चषक नितेश जाधव तर टी शर्ट रणजित काकडे यांनी दिले.
विघ्नहर्ता क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला ” क्रिकेट क्लब ऑफ लोणावळा” तर द्वितीय क्रमांक “शुभम गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात विघ्नहर्ता 12 ” तर तृतीय क्रमांक “कोराई ट्रेकर्स कुरवंडे ” तर चतुर्थ क्रमांक “डी डी ग्रुप खंडाळा” याने पटकावला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि.28 रोजी महाराष्ट्र मातंग समाज मंच गावठाण येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी खंडू बोभाटे, केतन गायकवाड, सुदिन उजगरे, निरंजन कांबळे, विक्रम बोभाटे खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.