Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केला कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश..

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत केला कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश..

सांगली जिल्ह्यातील विटा येथील असंख्य राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला , आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आज येथील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यानी भाजप मधे प्रवेश केला यामुळे विट्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

विटा येथील प्रकाश निंबाळकर, रणजीत निंबाळकर, कृष्णा लाटकर, शंकर दांडेकर, अनिल चन्ने,बालाजी दांडेकर यांच्यासह विट्यातील अनेक शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी भाजप मध्ये प्रवेश केला.


यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ,भाजप खानापूर तालुक्याध्यक्ष सुहास पाटील, युवा नेते पंकज दबडे भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सत्यजित पाटील, भाजप युवा मोर्चा विटा शहराध्यक्ष धीरज पाटील, संतोष यादव, विक्रम भिंगारदिवे, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page