
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत लसीकरण संघर्ष समिती , विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती मुद्रे खुर्द , उपजिल्हा रुग्णालय कर्जत , कर्जत नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज विठ्ठल रखुमाई देवस्थान मुद्रे खुर्द सभागृह येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले असून यावेळी नागरिकांनी लस घेऊन चांगलाच प्रतिसाद दिला.
यावेळी विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीने कर्जत लसीकरण संघर्ष समितीचे सदस्य विनोद पांडे , ऍड .कैलास मोरे , कृष्णा जाधव , शिव सेवक गुप्ता , अमीर मणियार , निलेश हरिश्चंद्र , मन्सूर बोरी , सुमेश शेट्ये , प्रशांत उगले , नगरसेवक बलवंत घुमरे , माजी नगरसेवक कृष्णाजी घाडगे , शाखाप्रमुख प्रमोद खराडे , अशोक मोरे , नितीन मोरे , मयुर मोरे , उद्योजक राजू गजमल व मुद्रे – खुर्द येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे , कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबिर संपन्न झाले . यावेळी डॉ.संगीता दळवी व त्यांच्या टीम ने लसीकरण केले.