Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडविद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास करण्यासाठी पास द्यावा ,कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी !

विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास करण्यासाठी पास द्यावा ,कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी !

ऍडमिशन न झाल्यास जबाबदार कोण ?

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
नुकतेच १० वी आणि १२ वी चे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध कॉलेज मध्ये ऍडमिशनसाठी कर्जत बाहेर बदलापूर – उल्हासनगर – कल्याण – डोंबिवली – मुंबई येथील महाविद्यालयात जावे लागणार आहे.परंतु सध्या कोरोना च्या नियमामुळे विद्यार्थ्यांना प्रवासी पास नाकारला जात आहे.

त्यामुळे ऍडमिशन घेण्यासाठी जाता येत नाही.उशीर झाल्यास आम्हाला ऍडमिशन मिळणार नाही अश्या अनेक विद्यार्थी आणि पालकांनी भाजप कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे आणि भाजप पदाधिकारी यांचेकडे तक्रार केली.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने हि गंभीर बाब लक्षात घेऊन त्वरित विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पास द्यावेत , अशी मागणी आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर भारद्वाज आणि रेल्वे पोलीस निरीक्षक उबाळे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.


कोरोना संसर्ग महामारी काळात रेल्वे प्रवास करण्यास बंदी आहे . तर शासनाने दोन डोस घेतलेल्याना प्रवासास मुभा जरी दिली असली तरी कोरोना लस अद्यापी अनेकांनी घेतली नाही.तर लसीकरण तुटवडा देखील असल्याने अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.

मात्र त्याचा फटका त्यांना आत्ता कॉलेज प्रवेशासाठी होत असल्याने रेल्वे प्रवासा अभावी कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार नसल्याने यास जबाबदार कोण ? असा सवाल भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी उपस्थित केला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पास द्यावा,अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

तसेच या समस्येवर चर्चा झाली असता त्यांनी आपली मागणी वरिष्ठांना पाठवून योग्यती कार्यवाही करू असे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर भारद्वाज यांनी दिले.या प्रसंगी भाजप किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे , युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील , युवा शहर अध्यक्ष मयुर शितोळे , चिटणीस सर्वेश गोगटे , महाविद्यालयिन विद्यार्थी आघाडी तालुका संयोजक अभिषेक तिवारी , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page