Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळाविद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस. हायस्कूल लोणावळाच्या प्राचार्य पदी विजयकुमार...

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस. हायस्कूल लोणावळाच्या प्राचार्य पदी विजयकुमार जोरी…..

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस. हायस्कूल लोणावळा च्या प्राचार्यपदी विजयकुमार जोरी सर यांची नियुक्ती करण्यात आली असून 30 जून रोजी त्यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यावेळी माजी. प्राचार्य संजीव रत्नपारखी सर यांनी निवृत्त होत आपल्या पदाचा कार्यभार जोरी सर यांच्यावर सोपवून त्यांची पदौन्नती करण्यात आली आहे.

प्राचार्य विजयकुमार जोरी सर यांनी वेगवेगळ्या शाखांमधून गेली 32 वर्ष निस्वार्थ सेवा केली आहे. त्यांचा अनुभव, विध्यार्थ्यांविषयी आपुलकी, प्रेम, आपल्या सहकाऱ्यांबरोबरचा सुसंवाद, सामाजिक बांधिलकी यासाठी जोरी सर चर्चेत आहेत.त्याच बरोबर जोरी सर पुणे भारत स्काऊट गाईड मध्ये सहाय्यक जिल्हा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत त्याच अनुषंगाने मागील वर्षी राज्य पातळीवरील उत्कृष्ट स्काऊटर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे अनगिणत पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. जोरी सर एक खूप सुंदर लेखक असून त्यांनी कृष्णाकुमार ह्या नावाने चार पुस्तके लिहिली आहेत त्यातील एक प्रकाशित होऊन अन्य तीन प्रगती पथावर आहेत. सरांच्या ह्या पदौन्नतीमूळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आहे. विजयकुमार जोरी सर यांना प्राचार्य पदाचा कार्यभार सोपविण्यासाठी आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी विद्या प्रसारिणी सभेचचे मा. अध्यक्ष गोवर्धन शिंगरे, मा. कार्यवाहक दिलीपशेठ सराफ, मा. सहकार्यवाहक सतीश गवळी, मा. शाळा समिती अध्यक्ष बच्चूभाई पत्रावाला, मुख्य लिपिक भगवान आंबेकर, पर्यवेक्षक दादाभाऊ कासार, रामदास दरेकर, पर्यवेक्षिका उज्वला पिंगळे तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते धीरूभाई टेलर इत्यादी गुरुजनवर्ग व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page