Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडविधवा महिला शेवंती खरात यांच्या घरावर दरड कोसळली,घर जमीनदोस्त पाच जनावरांचा मृत्यू...

विधवा महिला शेवंती खरात यांच्या घरावर दरड कोसळली,घर जमीनदोस्त पाच जनावरांचा मृत्यू…

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
कोकणात मुसळधार पाऊस पडत असून महाड पाठोपाठ आता खेड तालुक्यातील पोसरे सडेवाडी येथील गावात दरड कोसळली असून येथील विधवा महिला शेवंती विठ्ठल खरात यांच्या राहत्या घरावर मोठी दरड कोसळली असून शेवंती आणि दोन लहान नातू यातून बचावले असून तर यात 2 बैल व 3 वासरांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला, तर घरात असलेले दागिने, तांदूळ, कागदपत्रे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत, तर बाकीच्या घरांना तडे गेले आहेत.

खेड तालुक्यातील डोंगरांच्या पायथ्याशी असलेले पोसरे सडेवाडी हे गाव असून या गावात सुमारे 12 घरे आहेत, मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसाने कोकणात हाहाकार माजवला असून सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.


त्यातच विधवा महिला आणि धनगर समाज बांधव शेवंती विठ्ठल खरात यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्यांचे राहते घर जमीनदोस्त झाले आहे, मात्र त्या स्वतः व त्यांचे दोन नातू यांना कसेबसे ग्रामस्थांनी वाचवले असून यात गुरांचा गोठाही जमीनदोस्त झाला असून दोन बैल व तीन वासरांचा मृत्यू झाला आहे मात्र अजूनही शासनाचे कुठलीही अधिकारी किंवा कर्मचारी याकडे फिरकला सुद्धा नाही ,त्यामुळे आम्हाला सरकारची मदत मिळेल या प्रतीक्षेत शेवंतीबाई खरात वाट पाहत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page