Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडविनयभंगाचे गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक, कर्जत रेल्वे पोलीस ठाणे जवानांची धडक मोहीम..

विनयभंगाचे गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक, कर्जत रेल्वे पोलीस ठाणे जवानांची धडक मोहीम..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे)रेल्वे स्थानकावर मुलींना छेडछाड करण्याचे प्रकार आजही घडत आहेत , मात्र हे करत असताना पोलीस विभागाच्या तिसऱ्या डोळ्यात आपण कैद होत आहे , याचा विसर तरुणाईला होतो , यावर तक्रार आल्यास पोलिसांच्या तावडीत तुम्ही भेटता , व आपला रेकॉर्ड खराब झाल्याने भविष्यात याबाबत विचार करण्याची वेळ तरुणाईने करावी , अशीच एक घटना नेरळ रेल्वे स्थानकात घडली आहे.

दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी कर्जत रेल्वे पोलीस ठाणे गु.र.नं ८२/२०२१ कलम ३५४.३५४(ड).५०४.३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या अनुशंगाने गुन्हा घडलेल्या ठिकाण व वेळीचे नेरळ रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ०२ वरिल सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले असता, सदर सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या.
तक्रारीनुसार १) अनोळखी इसम, वय अंदाजे २१ वर्ष, रंगाने सावळा, कपडे – अंगात मरून काळ्या रंगाचा शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची फुल पँट, २) अनोळखी इसम, वय अंदाजे २२ वर्ष, कपडे – अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, नेसणीस निळ्या रंगाची हाफ पँट, रंगाने गोरा, हे दिसुन आले, तेव्हा सदर सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये दिसुन येणारे इसमाचा शोध घेणे कामी, खास खबरीचा व तसेच तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून आरोपीचा शोध घेतला असता, सदर फुटेजमध्ये दिसुन येणारे इसम हे १) गौरव रविंद्र सोनवले, वय २० वर्ष, राह – गणेश चौक, शिवमंदिराचे बाजुला, शेलु, ता. कर्जत, जि. रायगड २) प्रशांत उर्फ पप्पु जयराम डांगरे, वय २० वर्ष, राह – कोलंबा माता मंदिरजवळ, शेलु, ता. कर्जत, जि. रायगड असे असल्याचे निष्पन्न झाले.
तेव्हा नमुद गुन्ह्यातील इसमाचा शोध घेनेकामी दिनांक ०६ जानेवारी २०२२ रोजी कर्जत रेल्वे पोलीस ठाणे येथील गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार पोहवा ३३१६ पाटील, पोना १४४२ ठाकुर, पोशि ११३७ पठाण तसेच वाहनचालक पोहवा २८ मोरे हे सरकारी वाहनाने बदलापुर शहर येथे गेले असता, सदरचे आरोपी हे वांगणी गाव येथे असल्याचे माहिती मिळाली, तेव्हा वांगणी येथे जाऊन सदर इसमाचा शोध घेतला असता, सदर आरोपी हे सरकारी वाहन बघताच पळू लागले, तेव्हा नमुद इसमाचा पाठलाग करुन त्यांना पकडले, तसेच त्यांना गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार यांनी ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेत आमच्या समक्ष हजर केले, तेव्हा त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्याचे नाव १) गौरव रविंद्र सोनवले, वय २० वर्ष, राह :- गणेश चौक, शिवमंदिराचे बाजुला, शेलु, ता. कर्जत, जि. रायगड २) प्रशांत उर्फ पप्पु जयराम डांगरे, वय २० वर्ष, राह :- कोलंबा माता मंदिरजवळ, शेलु, ता. कर्जत, जि. रायगड असे सांगितले.
लागलीच दोन पंचाना बोलावुन त्यांचा अंगझडती व अटक पंचनामा करण्यात आला, त्यांच्या अंगझडतीमध्ये कोणतीही चीज-वस्तु, दाग-दागिने, पैसा-अडका काहीएक मिळुन आले नाही, तसेच त्याच्या शरीरावर जुन्या किवा नवीन मारहाणीच्या जखमा दिसुन येत नाही, नमुद गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा गुन्हा त्यांनीच केला असल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तसेच पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने , गौरव रविंद्र सोनवले, व प्रशांत उर्फ पप्पु जयराम डांगरे, यांस नमुद गुन्ह्यात ३५४.३५४ (ड).५०४.३४ भा.द.वि अन्वये अटक करून मा. न्यायालयात हजर केले. सदर बाबत आरोपीना पकडल्याने संभाजी यादव – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी पोलीस जवानांचे विशेष कौतुक केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page