Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडविनाकारण फिरणाऱ्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर खालापुर पोलिसांची कारवाई..

विनाकारण फिरणाऱ्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर खालापुर पोलिसांची कारवाई..

खालापूर प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे) 14 : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत असताना सरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असून यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे खालापूर पोलिसांनीही नाकाबंदी लावत विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सातत्याने सुरु केली आहे.त्याच अनुषंगाने खालापूर पोलिसांनी खालापूर फाटा येथे कोणत्याही कामाशिवाय विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांची तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली ,या कारावाई मुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आणि यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -