विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जोडो मारो आंदोलन..

0
19

खोपोली (दत्तात्रय शेडगे)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना जोरदार घोषणाबाजी केली. आ.दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन करीत निषेध व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल करीत राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे असा टोला लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेश दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दरेकरांचा खरपूस समाचार घेत महिला पदाधिकाऱ्यांंना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश देताच राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहराच्या वतीने गुरूवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी -11 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात  जोरदार घोषणाबाजी करीत दरेकरांच्या फोटो जोडे मारून आंदोलन केले.

यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेवक मोहन औसरमल,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे,नगरसेविका सविता गायकवाड, सेक्रटरी जयश्री डोंगरे, उपाध्यक्षा अश्विनी ढोले ,प्रज्ञा महाडिक, उर्मिला गायकवाड, प्रियाका मोरे,भाग्यश्री गुडूर,गौरी भस्मे, महिला कार्यकर्त्या तसेच चित्रपट सांसकतिक विभाग शहर अध्यक्ष अमित पवार, युवकचे सल्लागार विनोद रजपूत, भास्कर लांडगे,विशाल गायकवाड,जयेश गोसावी आदि पदाधिकारी उपस्थित होते.