वाकसई : करंडोली येथे मेंढया शेळ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याने त्या मेंढपाळ कुटुंबाला भाजप मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र अप्पा भेगडे यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
पारनेर तालुक्यातील मेंढपाळ बांधव संतोष काळूराम बरकडे हे गेली अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन येत असतात. यावर्षी देखील ते 250 शे मेंढ्या घेऊन मावळ तालुक्यातील करंडोली येथे आले होते. मेंढ्या चरत असताना अन्नामधून विषबाधा झाल्याने दुर्दैवाने त्यांच्या 170 मेंढ्यां मृत्युमुखी पडल्या यामुळे बरकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मावळ तालुक्यात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज संतोष काळुरम बरकडे व त्यांच्या सहकारी बांधवांना भाजप पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे बोलावून घेत भाजप मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र अप्पा भेगडे यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली व शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करण्याचा शब्द बरकडे कुटुंबांना दिला.
याप्रसंगी ता.सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, ह.भ.प. सुनील महाराज वरघडे , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजीत नाटक,चेअरमन यादव सोरटे आदी प्रमुख उपस्थित होते.