विसापूर गडावर स्वच्छता मोहीम..वन विभाग पुणे, वन्यजीव रक्षक मावळ व ट्रेक आऊटट्राश ग्रुपचा उपक्रम…..

0
87

पवनानगर : मावळ तालुक्यातील विसापुर गडावर वन विभाग पुणे,वन्यजीव रक्षक मावळ संस्था, ट्रेक आऊट ट्राश ग्रुपच्या वतिने शनिवार( दि.६) रोजी गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेअंतर्गत गडावरील संपुर्ण प्लास्टीक,पाण्याच्या बाटल्या,खाऊचे रॅपर इतर कचरा गोळा करण्यात आला.

कचरा गोळा करुन स्वच्छतेचा निर्धार व्यक्त करण्यात आला. व गडावरील कचरा प्लॅस्टिक पिशव्यानमध्ये भरुन गडावरुन खाली आणण्यात आला.

या मोहिमेत वनविभाग पुणे चे वनरक्षक- आंबू पवार,वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे अध्यक्ष निलेश गराडे, उपाध्यक्ष अनिल आंद्रे,सदस्य प्रथमेश मुंगेकर, विक्की दौंडकर, शत्रुघ्न रासनकर, जिगर सोलंकी, श्रेयश कांबळे.ट्रेक आऊटट्राश चे अध्यक्ष अनुराग डोरगे,आकाश शिंदे,शिवानी दोरगे,निनाद कांबळे, अंजना कल्लापुर,निवेदिता हुपले,नीरज राऊत,यश परांडे,राखी पोटफोडे,दर्शन शेळके,शुभम कोरे,स्वरुप वीर,ओंकार सुर्यवंशी, सुमिरन मिस्री,संकेत पाटील,सुजित कोकाटे इत्यादी उपस्थित होते.तर सदर उपक्रमास रेड बुल कोलड्रींक्सचे अभिषेक राव यांनी विशेष सहकार्य केले.


सदर मोहिमेअंतर्गत वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे अध्यक्ष निलेश गराडे यांनी गडावर येणाऱ्या पर्यटकांनी गडावर‌ स्वच्छता राखलीच पाहिजे, प्रत्येकाने गड हे आपले वैभव आहे याचे भान ठेवून ती स्वतः ची जबाबदारी समजुन स्वच्छता राखावी असे आव्हान केले.