Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवीज कंपनीवर अदानी ग्रुपचा डोळा , उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना विरोध दर्शविण्याचे...

वीज कंपनीवर अदानी ग्रुपचा डोळा , उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना विरोध दर्शविण्याचे वीज कंपनीच्या अधिका-यांचे आवाहन !

समांतर परवानगीला विरोध करण्यासाठी सर्व युनियन सरसावल्या..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र राज्यातील ठाणे , नवी मुंबई , उरण , पनवेल , तळोजा या परिसरात महावितरण कंपनीच्या अधिपत्याखाली वीज कंपनी चालवायला देण्यासाठी समांतर परवाना मिळावा ,यासाठी अदानी ग्रुप परवानगी मागत असल्याने या विरोधात वीज कंपनीतील सर्व युनियन सावध झाल्या असून या विरोधात तुम्हीही शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख म्हणून नितीनदादा सावंत यांनी विरोध करावा , असे आवाहन कर्जत वीज कंपनी कार्यालयातील अधिकारी , अभियंता व कर्मचारी वर्गाने केले आहे.
अदानी ग्रुप कंपनीने राज्यातील महसूलदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा ठाणे , नवी मुंबई , उरण , पनवेल , तळोजा या महत्त्वाच्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केलेला आहे.अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग देशांमध्ये होत आहे , जर असा परवाना देण्यात आल्यास विज दर विशेष करून शेती , दारिद्र रेषेखालील ग्राहक , सार्वजनिक पद्धतीचे ग्राहक , व्यापारी इत्यादींना अदानी ग्रुप ची विज खरेदी केल्यास आज जो महावितरण कंपनीला वार्षिक १२ हजार कोटी महसूल मिळत आहे त्यामध्ये हजारो कोटींचा वाटा हा सबसिडीचा आहे , तो बंद होऊन वीज ग्राहकांना दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व त्यामुळे महाराष्ट्राची जनता भविष्यात वाढवून दिलेल्या दरामुळे वीज वापर करू शकणार नाही , अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
यापूर्वीच महाराष्ट्र राज्यात नागपूर , जळगाव , औरंगाबाद , मालेगाव , दिवा , मुंब्रा , हि शहरे खाजगी कंपनीकडे गेली असल्याने वीज कंपनी सध्या डबघाईत आहे.म्हणूनच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन , महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सबर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन , विज कर्मचारी अभियंता सेना युनियन , महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार काँग्रेस इंटक , ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन , महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना , विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन , मरावी तांत्रिक कामगार युनियन , महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन , महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना , जनरल पावर फ्रंट , महाराष्ट्र राष्ट्रवादी वीज कामगार काँग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना , म रा वी ऑपरेटर संघटना , बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कामगार संघटना , बहुजन पावर कर्मचारी संघटना , म रा वी कामगार फेडरेशन इंटक , एम एस ई बी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी संघटना , या सर्व संघटनांनी एकत्र येऊन पुढील धोका लक्षात घेऊन विरोध म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तशी नोटीस महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेली आहे.अदानी पॉवर कडून महावितरण गिळंकृत करण्याचा प्रयत्न , हुकूमशाही विरुद्ध लढण्याचा निर्धार , वीज ग्राहकांचे मिळणारे अनुदान बंद होणार , त्यांचा उद्देश्य फक्त नफा कमावणे , असल्याने म्हणून जनतेच्या हक्काचा वीज उद्योग वाचवण्यासाठी राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी देखील या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन विरोध करावा , यासाठी आज कर्जतमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पालिकेचे गटनेते नितीनदादा सावंत यांना कर्जत वीज कंपनी कार्यालयातील अभियंते , कर्मचारी – कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबींचा विरोध दर्शवावा , असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page