Friday, June 14, 2024
Homeपुणेतळेगाव"वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे",महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे…

“वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे”,महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे…

मावळ (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे नगरपरिषद व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कान्हे यांच्या संयुक्त विद्यमाने”माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत” स्टेशन तळे परिसरात दि.13 रोजी.देशी प्रजातीच्या 105 वृक्षांची लागवड करण्यात आली.
सदर वृक्ष लागवडीसाठी महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या वतीने कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक शिवाजी झनझणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. ज्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा समन्वय घडवून आणला, ज्यांचे माध्यमातून हा उपक्रम घडवून आला असे विद्याभूषणजी सदर उपक्रमासाठी सहकुटुंब उपस्थित होते. तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी नगर परिषदेच्या वतीने श्रीमती. ममता राठोड, उपमुख्याधिकारी,श्रीमती. सुवर्णा काळे, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख, जयंत मदने, मिळकत विभाग प्रमुख विशाल मिंड, अतिक्रमण विभाग प्रवीण माने, आवक-जावक विभाग प्रमुख,वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निलेश गराडे उपस्थित होते.
सदर कार्याक्रमाचे नियोजन उद्यान विभागामार्फत सिद्धेश्वर महाजन, उद्यान विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी रणजीत सूर्यवंशी,आकाश निंबळे व त्यांची टीम द्वारे करण्यात आले. सदर कार्यक्रम समारोप प्रसंगी शिवाजी झनझणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना वृक्ष लागवड व संगोपन काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच “वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे” या पंक्तीस अनुसरून वृक्षांचा सुद्धा आपण आपल्या पाहुण्यांप्रमाणे आदर करावा असा संदेश आपल्या मनोगतातून दिला,नगर परिषदेचे आभार व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page