Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळावेहेरगाव येथील अवैध मटका धंद्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई 17,29,500 चा मुद्देमाल...

वेहेरगाव येथील अवैध मटका धंद्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई 17,29,500 चा मुद्देमाल हस्तगत…

लोणावळा (प्रतिनिधी): वेहेरगाव येथील अवैध मटका धंद्यावर उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारत पाच जणांकडून तब्बल 17 लाख 29 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करत कारवाई करण्यात आली.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहिती नुसार IPS सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, काही इसम स्वता: च्या फायद्याकरीता कल्याण नावाचा मटका घेत आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वत: पथकासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वेहेरगाव येथे दि. 29 रोजी सांय 6:10 वा.च्या सुमारास मटक्यावर अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी संतोष ज्ञानदेव बोत्रे (रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे), राहुल अशोक गायकवाड (रा. कार्ला ता. मावळ जि. पुणे) हे दोघे मटक्याचे साहीत्यासह मटका घेताना मिळुन आले तर संजय सदानंद रेवाळे (रा. वेहेरगाव ता. मावळ जि.पुणे), चंद्राकांत धावजी देवकर (रा. रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे), जयेश जनार्दन खोत (रा. वेहेरगाव ता. मावळ जि.पुणे), सिध्दार्थ फकिरराव खरात (रा. केशवनगर ता. मावळ जि. पुणे), प्रमोद दामु अहिरे (रा. शिलाटणे ता. मावळ जि. पुणे),व दत्ता फुलचंद जाधव (रा. वेहेरगाव ता. मावळ जि.पुणे) अशी मटका खेळत असताना मिळुन आलेल्यांची नावे आहेत.
यांच्यावर धडाकेबाज कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 17 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक, व त्यांचे पथक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अंमलदार नायकुडे, शिंदे, गणेश होळकर, पवार, शिंदे यांनी केली आहे.
तसेच यापुढे मावळातील लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, कामशेत, वडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोठेही अवैध धंदे सुरु असतील तर त्याबाबत माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच माहीती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही IPS सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page