कार्ला (प्रतिनिधी): कार्ला ग्रामीण परिसरातील पाटण, वरसोली, शिलाटणे व वेहेरगाव या गावांत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून वेहेरगाव येथील साखळी उपोषणास आज सहावा दिवस आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या लढ्यास प्रोत्साहन म्हणून कार्ला परिसरात वेहेरगाव,वरसोली,पाटण व शिलाटणे या गावांमध्ये साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.आज वेहेरगाव,शिलाटणे येथील साखळी उपोषणाचा सहावा दिवस आहे.
आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या जरांगे पाटील यांच्या लढ्यास प्रोत्साहन देत विविध गावांमधील ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने साखळी उपोषणात सहभागी होत आहेत.तसेच पाटण येथील तरुण व महिलांनी साखळी उपोषणात भजन रुपी सेवा सुरु केली आहे.तर शिलाटणे येथे साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.