वेहेरगाव येथील 55 दुकानदारांची कोविड चाचणी करण्यात आली…

0
267

कार्ला- दि.23 :लाखोभाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आई एकविरादेवी पायथ्याशी असणा-या वेहरगाव येथे आई एकविरादेवी पायथा मंदिरात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला,समुद्रा कोविड सेंटर व वेहरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायत यांच्या वतिने ५५ व्यावसायिक व दुकानदाराची आरपीटीसीआर कोविड तपासणी करण्यात आली.


एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद असून देखील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी येथील दुकानदार व रिक्षा चालक व ग्रामस्थांनी कोविड तपासणी करुन घेतली आहे.


यावेळी वेहरगाव ग्रामपंचयात सरंपच अर्चना देवकर,उपसरपंच काजल पडवळ,पोलिस पाटील अनिल पडवळ,टपरी संघटना अध्यक्ष संजय देवकर,सदस्य राजु देवकर,अनिल गायकवाड,
प्रा. आ. कार्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ .भारती पोळ समुद्र कोविड केअर सेंटर चे वैद्यकीय अधिकारी डॉ मिलिंद सोनवणे. आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार .लॅब टेक्निशियन मनीषा खेडेकर तसेच समुद्र कोविड केअरचे कर्मचारी उपस्थित होते.