Thursday, November 21, 2024
Homeपुणेमावळवेहेरगाव येथे अवैध मटका अड्यावर पोलिसांचा छापा , सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल..

वेहेरगाव येथे अवैध मटका अड्यावर पोलिसांचा छापा , सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल..

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा विभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई. कारवाई मध्ये रोख रकमेसह एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करून मटका अड्डा चालविणाऱ्या व मटका लावणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगांव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी आज दिनांक 29/12/2023 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता मौजे वेहेरगाव येथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट व मटका लावणारे 10 इसम हे ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम व इतर असा एकूण 2,50,485रू.( दोन लाख पन्नास हजार चारशे पंच्यानशी) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या छाप्यामध्ये 1) चंद्रकांत देवकर, 2) शंकर बोरकर, 3) निलेश बोरकर, 4) संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 16 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो हवा सचिन गायकवाड, पो हवा अंकुश नायकुडे, पोना रईस मुलानी, पो शी सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page