वेहेरगाव येथे बाल उद्यानासाठी विविद्ध खेळणी भेट……

0
138

वेहरगाव- मावळ ( प्रतिनिधी- गणेश कुंभार दी.20 रोजी सरंपच चंद्रकांत देवकर व वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत पडवळ यांच्या विशेष प्रयत्ननातून वेहरगाव वन व्यवस्थापन समितीच्या वतिने दोन लाखाच्या निधीतुन लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याणात विविध खेळणी देण्यात आली असून वनविभाग उपवनरक्षक श्रीलक्ष्मी,राहुल पाटील,वनक्षेत्रपाल धुलशेट्टी,सुल्तान शेख,सरंपच चंद्रकांत देवकर,उपसरपंच राखी पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही खेळणी ग्रामपंचयातीला सूपूर्त करण्यात आली.

वेहरगाव हे आई एकविरादेवी पायथ्याशी असून गावातील मुलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान होणार असून यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झोके,झु पार्क,घोडा गाडी,चकर गाडी अशा अनेकप्रकारची खेळणी आणण्यात आली असून कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर हे उद्यान सुशोभीकरण करुन खेळण्यासाठी खुले होणार आहे.

यावेळी शिवसेना मावळ संघटक सुरेश गायकवाड,वेहरगाव माजी सरंपच गणपत पडवळ,दत्तात्रय पडवळ,संतोष रसाळ सेवादलचे संजय देवकर,माजी उपसरपंच द्रोपदाबाई गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ,उद्योजक बबनराव माने,नाणे मावळ अध्यक्ष राजु देवकर,मनसेचे अशोक कुटे,राष्ट्रवादी विद्यार्थीचे आनंद पडवळ, ,प्रसिद्धी प्रमुख तानाजी पडवळ,पोलिस पाटील अनिल पडवळ,माजी विद्यार्थी अध्यक्ष किरण येवले,देवस्थानचे विजय देशमुख ,संतोष गायकवाड ,मोरेश्वर पडवळ, अनिल गायकवाड,गणेश बोरकर, संतोष देवकर,रमेश पडवळ,सागर देवकर,युवराज देवकर,सुनिल गायकवाड,सोमनाथ लांडगे,दिनेश गायकवाड,सोमनाथ देवकर,संतोष बोत्रे,विनोद देवकर,शकर बोरकर,गणेश पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.

आजची पीढी लहान मुले मोबाईलच्या जास्त संपर्कात येवु लागली आहे.अशाने लहान मुलांना मैदानी खेळांचा वीसर पडु लागला आहे.पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासुन जास्तीत जास्त दुर ठेवण्याचा प्रयत्न करुन, मैदानी खेळांमध्ये आवड निर्माण करुन देणे हे मुलांच्या भवितव्यासाठी चांगले असणार आहे.