वैजनाथ ते कराळेवाडी रस्त्याची दुरावस्था : प्रवासादरम्यान नागरिकांना करावी लागते कसरत…

0
77
( कर्जत:प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे)
दि.10.कर्जत तालुक्यातील वैजनाथ आणि कराळे वाडी या दोन विभागांना जोडणारा रस्ता आणि रस्त्यावरील मोरीचा भागमोठ्या प्रमाणत खचल्यामूळे या मार्गावरून जाताना कोणत्याहि क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.पाऊसामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.
त्याचप्रमाणे परिसरातील हा रस्ता 50 मीटर अंतरावरून टाटा पावरकडे जाणारा जुना मार्ग आहे.ह्या रस्त्यावरून परिसरातील अनेक गावांची मोठ्या प्रमाणत वाहतूक होत असते.तसेच परिसरातील अनेक चाकरमानी कामावरून रात्री अपरात्री जात येत असतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
त्याचप्रमाणे गावातील वैजनाथ,कराळेवाडी,गौळवडी येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून सूद्धा प्रशासनाचे रस्त्याच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे,तरी ही महत्वाची बाब लक्षात घेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर रस्तावरून प्रवास करीत असताना संघटनेच्या सामजिक कामाकरीता जातावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे,उपअध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि वकील संदीप साळवी गौळवाडी ते कराळेवाडी प्रवास करीत असताना हि बाब निदर्शनास आली आहे.तसेच नागरिकाच्या वतीने संघटनांच्या वतीने शासनाने या रस्ताच्या समस्या निवारण करणयात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.