Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" व्हिलचेअर नव्हे , माणुसकीचा आधार " शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य...

” व्हिलचेअर नव्हे , माणुसकीचा आधार ” शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था व डीकसळ येथील गोरगरिबांचे आधारस्तंभ सागरभाऊ शेळके तसेच शिवस्वराज्य संस्थेचे कार्यकारणी सदस्य कु . नरेश कृष्णा भोईर आणि आण्णा बोराडे यांच्या पुढाकाराने आज कर्जत तालुक्यातील एकसळ गावातील कु मंगेश जगन मते यांना व्हिलचेअर देण्यात आली.
” हि व्हिलचेअर नसून माणुसकीचा आधारच असून ” या स्तुत्य उपक्रमामुळे पुन्हा एकदा शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या मदतरुपी दिलेल्या आधाराची सर्वत्र वाहवा होत आहे.

त्याप्रसंगी संस्थेचे आरोग्य विषयक सल्लागार डॉ. राकेश पाटील (सुविधा हॉस्पिटल) , संस्थेचे अध्यक्ष अक्षय सुभाष जाधव , संस्थेचे उपाध्यक्ष अतिश भोईर , संस्थेचे कार्याध्यक्ष हरेश्र्वर भोईर , सचिव विकास शेळके , संस्थेचे खजिनदार निलेश घरत , संस्थेचे सहखजिनदार आकाश शेळके , भुषण कोठावले (सुविधा मेडिकल) , संस्थेचे कार्यकारणी सदस्य समीर भोईर , मयुर जाधव , प्रशांत बोराडे , योगेश गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page