![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संगीता कोल्हे यांनी प्रशालेच्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयास काही पुस्तके भेट स्वरूपात दिली आणि सेवानिवृत्तीपर्यंत दरवर्षी अशीच नवनवीन पुस्तके भेटीच्या स्वरूपामध्ये दिले जातील असे आश्वासित केले. यावेळी ग्रंथालय प्रमुख संजीवनी आंबेकर व ग्रंथालय सहाय्यक बाळू माने यांनी दिलेल्या भेटीचा स्वीकार केला.
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी.एस.हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक सहविचार सभेचे आयोजन दि.7 रोजी करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्ष नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर होते.
सभेचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी अनिल खामकर यांनी केले.सभेसाठी प्रशालेचे प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका सुनिता ढिले, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे, प्रशालेचे मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
सहविचार सभेमध्ये अध्यक्ष भगवानभाऊ आंबेकर,प्राचार्य महिंद्रकर,उपमुख्याध्यापिका ढिले, पर्यवेक्षक गजेंद्रगडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी गंगाधर गिरमकर, संजय पालवे आणि सचिन लांडगे यांनी शिक्षकांचे काही प्रश्न अध्यक्षांच्या समवेत मांडली आणि अध्यक्षांनी देखील समस्येचे निराकरण करण्याचा शब्द दिला. सभेसाठी उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक गजेंद्रगडकर यांनी मांनले.