Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळाव्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिवजयंती उत्सहात संपन्न…

व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिवजयंती उत्सहात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी):व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा महाविद्यालयात 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ठाकूर यांच्या हस्ते “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली, त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.तसेच पोवाडे सादर केले.आणि प्रथमच वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page