Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाव्ही पी एस प्राथमिक शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

व्ही पी एस प्राथमिक शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत क्रीडा पारितोषिक वितरण आणि कवायत प्रात्यक्षिके कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, संस्थेचे कार्यवाह डॉ.सतीश गवळी व विजय भुरके यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेत होणारे विविध मैदानी खेळाची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाला समितीचे अध्यक्ष अरविंदभाई मेहता शाला यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून राजूशेठ खांडेभरड यांच्या सह शाला समिती सदस्य डॉ. धीरूभाई कल्याणजी,शाला समिती सदस्य गिरीषजी पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदभाई मेहता यांनी आपल्या मनोगतात आजच्या स्पर्धेच्या युगात खेळाला महत्वाचे स्थान आहे. आज बाल वयात विविध खेळात सहभागी झालेल्या आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी बसवलेल्या कवायत प्रात्यक्षिक सादरीकरणाचे कौतुक केले.
क्रीडा पारितोषिक कार्यक्रमासाठी शिक्षक बापूराव भोसले, अमित रसाळ, शिक्षिका मनिषा जरग, सुनिता वरे, आशा खामकर, संगिता पाटील, स्वप्नाराणी भालेराव , स्वप्नजा राजगुरू या शिक्षकांनी कवायत प्रात्यक्षिक सादरीकरण करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
तसेच शिक्षकेतर कर्मचारी भिवाजी गायखे आणि जयश्री बागलकोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले. महादेव शिरसाट यांनी वार्षिक क्रीडा अहवाल वाचन केले तर संजय भालचिम यांनी बक्षीस पात्र विद्यार्थी यादी वाचन केले व हनुमंत शिंदे यांनी आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page