if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) : विद्या प्रसारिणी सभेचे व्ही. पी. एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन वर्षानंतर वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष होऊ न शकलेला समारंभ चालू वर्षी दिमाखात पार पडला. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन व ग्रंथालय प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाचा पालक व विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात आनंद घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन व्य. शिंगरे (बाबा), प्रमुख पाहुणे रामानंद चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली यांचे सल्लागार मनीष कुकरेजा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पूनम कुकरेजा, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, नियामक मंडळाचे सदस्य श्री. व सौ. कुदळे, भुरके, अरविंदभाई मेहता, कन्हैया भुरट, धीरूभाई टेलर, गिरीश पारख, नितीन शहा, संदीप अग्रवाल, भगवान आंबेकर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा अनिता देशमुख, उमा मेहता, रोहित तळेगावकर, नारायण पाळेकर, माजी सरपंच राजू खांडेभरड, जितूभाई कल्याणजी (सभापती लोणावळा नगरपरिषद), संजय गायकवाड, वरसोली इंग्लिश मीडियम स्कूल च्या निशा नाईक, इंग्लिश टीचिंग स्कूल लोणावळा च्या सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे समालोचन सुप्रिया भानवसे, श्रुती सोनवणे या विद्यार्थिनींनी केले. एकूणच तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात पहिला दिवस विविध गुणदर्शन, दुसरा दिवस प्रदर्शन व पारितोषिक वितरण आणि तिसरा दिवस व्ही. पी. एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिंगरे (बाबा) यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांनी मागील वर्षी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला लोणावळा परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक पत्रकार विविध वाहिन्यांचे रिपोर्टर्स उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, सेवक आणि स्काऊट आणि गाईड विद्यार्थी स्वयंसेवक यांनी अपार कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ ढुमणे, मान्यवरांचा परिचय प्राचार्य अंजनी गानू व पर्यवेक्षक विजय रसाळ यांनी तर आभार सुनीता ढिले यांनी मानले.