Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळाशरीर सौष्ठव स्पर्धा "शरदचंद्र श्री 2022" खिताबाचा मानकरी ठरला पुण्याचा प्रथमेश गुप्ते..

शरीर सौष्ठव स्पर्धा “शरदचंद्र श्री 2022” खिताबाचा मानकरी ठरला पुण्याचा प्रथमेश गुप्ते..

लोणावळा (प्रतिनिधी):राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने व राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर आयोजित आदरणीय खासदार मा . शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त ” शरदचंद्र श्री 2022 ” या भव्य राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन दि.11 रोजी सायंकाळी 6 वा.छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी राज्यातून नामवंत पुरुष व महिला बॉडी बिल्डर्स स्पर्धकांनी जास्त संख्येने आपला सहभाग नोंदविला. तसेच परिसरातील श्रोत्यांनी व प्रेक्षकांनी जास्त प्रमाणात उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष विनोद होगले व लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत हारपुडे यांच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शरदचंद्र श्री 2022 या खिताबाचा पुरुष गटातून प्रथमेश गुप्ते (पुणे ) तर महिला गटातून मोनिका अगावणे (मुंबई ) हिने शरदचंद्र श्री 2022 हा खिताब मिळविला. तसेच बेस्ट पोझर खिताब इशांत सिन्हा (कोल्हापूर),मोस्ट इन्कलुड बॉडीबिल्डर हा खिताब रोहित मुरूडकर ( मुंबई ) या ने मिळविला. यावेळी आयोजकांच्या वतीने महिला व पुरुष या दोन्ही गटातील “शरदचंद्र श्री 2022 ” या खिताबाच्या मानकरी विजेत्यांना रोख रक्कम ट्रॉफी, प्रशस्ती पत्रक व चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
सदर स्पर्धेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.अशी ही भव्य दिव्य राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा अगदी उत्सहात संपन्न झाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page