Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशरीर सौष्ठव स्पर्धेत बॉडी बिल्डरांचा " थरार ",उदय देवरे ठरला "लाखाचा मानकरी...

शरीर सौष्ठव स्पर्धेत बॉडी बिल्डरांचा ” थरार “,उदय देवरे ठरला “लाखाचा मानकरी “..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरात काल रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी शरीर सौष्ठव स्पर्धेत जवळ जवळ १५० च्या वर बॉडी बिल्डरांनी वेगवेगळ्या ” ॲक्शन मोड ” मध्ये प्रात्यक्षित दाखवून मावळ सह रायगडातून बॉडी बिल्डर स्पर्धा पहाण्यास आलेल्या शौकिणांना तोंडात बोटे घालायला लावली . मुंबई सारखा हा ” थरार ” स्पर्धकांनी कर्जतमध्ये दाखवला . कर्जत पोलीस मैदानात अलोट गर्दी या क्षणी पहाण्यास मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निरिक्षक सौ. माधवी ताई नरेश जोशी व प्रदेश सदस्य तथा उद्योजक श्री नरेश जोशी यांनी सुनियोजित आखणी करून तरुणांना ” एक जोश पूर्ण संधी ” या स्पर्धेच्या निमित्ताने दिली . विजेत्या स्पर्धकास १ लाखाचे बक्षीस व इतरांसाठी देखील रोख बक्षिसांची पर्वणी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सर्वांनाच गौरवून भविष्यात यशस्वी व्हा , असा आशीर्वाद देखील सौ. माधवी ताई नरेश जोशी यांनी सर्वांना दिला . तर आयुष्यात शरीरासाठी व्यायाम हा कायम महत्त्वाचा असून सर्व वयोगटातील व्यक्तींनी व्यायाम हा केलाच पाहिजे , असे मत व्यक्त करत महिलांनी देखील व्यायाम करून व्याधी मुक्त रहाण्यासाठी प्रथमच महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धा घेवून ” भावी खासदार ” सौ. माधवी ताई नरेश जोशी यांनी महिलांना प्रोत्साहन देण्याचे खूप मोठे कार्य केले . त्यांची हि संकल्पना नवीन पिढीस नक्कीच प्रोत्साहित करून तरुणींना भविष्यात उचित ध्येय गाठण्यास व संकटात भिडण्याचे बळ देईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे ” भावी खासदार श्री ” हि स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन सलग्न बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने वीर फिटनेस क्लब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक सौ. माधवी ताई जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. नरेश जोशी यांच्या माध्यमातून हि बॉडी बिल्डर स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत भाऊ पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष तथा मा. राजिप अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका भांडारकर , लॉयन ग्रुप अध्यक्ष बाळू शेठ फडके, पोलीस मित्र संघटना अध्यक्ष संतोष दादा चौधरी, ताराराणी ब्रिगेड संघटना अध्यक्षा वंदना मोरे , तालुकाध्यक्ष शंकर भुसारी , अतुल राऊत, आफताब शेख , जैंनुद्दिन शेख , ऍड. तुषारभाऊ मोरे , महिला पदाधिकारी व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . अनेक मान्यवरांनी देखील आपले विचार प्रकट करून ” भावी खासदार ” सौ. माधवी ताई नरेश जोशी यांना त्यांच्या उदंड कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी विजेत्यामध्ये खुल्या गटात जय भोईर , मेन्स फिजिक्समध्ये अनिकेत पाटील, महिलांमध्ये गौरी वरणकर, हे विजेते ठरले. तर ” भावी खासदार – श्री ” चा मानकरी ठरलेल्या ” उदय देवरे ” याला १ लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वीर फिटनेसचे रामदास भगत यांनी उत्तम नियोजन केले होते. तर कर्जतमध्ये पहिल्यांदा पनवेल येथील महिलांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत , टाळ्यांचा कडकडाट सह स्पर्धकांचा उत्साह वाढवला , तर विजेत्यांना पत्रकार बंधू व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page