शहरातील, वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव….. संदर्भात शहरातील सुरक्षितता….. याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे…

0
456

लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव खूप जोमाने सुरु झालेला आहे त्याला कारणीभूत कोण प्रशासन की नागरिक? सद्यस्तरावर लोणावळ्यातील सर्व बाजारपेठ व भाजी मंडई सातत्याने सुरु असून तिथे नागरिकांची गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. आणि त्यातच लॉकडाऊन खुलल्यास शहरात पर्यटकांची खूप जास्त प्रमानात गर्दी वाढली आहे.

व्यावसायिक दृष्टया प्रशासनाने बाजारपेठ सुरु ठेवण्यास परवानगी दिली परंतु त्यासाठी व्यावसायिकांना काही अटी देखील देण्यात आल्या होत्या. शहरातील दुकान व्यावसायिक वा फास्ट फूड व्यावसायीक व अन्य किरकोळ व्यावसायिक मात्र शासकीय अटींचे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील वाढती गर्दी त्यात दुकानदार कुठलीही सुरक्षा नबाळगता व्यवसाय करताना दिसत आहेत. म्हणजेच वडापाव विक्रेता दुकानात वडापाव विकताना हॅन्ड ग्लोउझचा वापर करत नाही. दुकानातील कामगार मास लावलेले दिसत नाहीत आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मास लावण्यास सक्तीही दुकानदाराकडून करण्यात येत नाही.त्याच प्रमाणे शहरात दुचाकीवरून ट्रिपलसीट वाहतूकही जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे.

त्याच बरोबर दुकानात आलेल्या ग्राहकांपासून सुरक्षा राखण्याची पूर्णतः जबाबदारी ही दुकान व्यावसायिकांची असल्यास कोणीही काळजी घेताना दिसत नाही याकडे मात्र नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.नगरपरिषद व पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर बिना मास फिरणाऱ्यांवर कारवाई होत आहे मग बिनमास व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांवर लक्ष कोण देणार, त्यांची बाकी आपली मनमानी सुरु आहे. त्याचबरोबर कुठल्याही दुकानाबाहेर सूचना फलक असल्याचे दिसून येत नाही. याकडे मात्र लोणावळा नगरपरिषद व लोणावळा पोलीस प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कारण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्यासाठी आणखी वेग मिळू नये म्हणून ही दक्षता घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्यास आपली जबाबदारी समजून आपल्या शहराला कोरोना मुक्त बनविण्यासाठी शासनास सहकार्य करावे.