if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राष्ट्रीय महामार्ग ५७८ शहापूर मुरबाड कर्जतमार्गे खोपोली हा महत्वाकांक्षी जोडरस्ता मा . नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने संपूर्ण सिमेंट – काँक्रीटचा होत आहे.हे काम टी अँड टी – पुणे ही कंपनी करीत आहे.सदरचे काम २८१ करोड रुपयांचे आहे.मात्र अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा या कामांत सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे , तर ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जात नाही म्हणून या महत्वपूर्ण रस्त्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र चिटणीस सुनील गोगटे यांनी पत्रव्यवहार करून रस्ते विकास महामंडळाला निर्वाणीचा ईशारा दिला आहे.
करोडो रुपयांचा हा महामार्ग रस्ता विशेषतः चारफटा कर्जत ते पळसदारी फाटा पर्यंत निकृष्ट दर्जाचे काँक्रीट केले आहे,रस्त्याला लेव्हल नाही,राज कॉटेज समोर वळणावर अनेक दुचाकी स्वार गाडी स्लीप होऊन पडून जखमी झाले आहेत.तर पुढे असलेल्या भिसेगाव येथील आदिवासीवाडी जवळ खोल दरी असल्याने तेथे संरक्षण भिंत व पाणी सुरळीत जाण्यासाठी सोय करणे गरजेचे आहे.या ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
शिवाय हा महामार्ग रस्त्याचे काम अनेक शेतक-यांच्या शेतातून गेले आहे.या शेतकऱ्यांना अजून त्यांचा मोबदला मिळाला नाही.याबाबतीत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आम्ही हे काँक्रीट तोडून पुन्हा करणार आहोत असे सांगत आहेत परंतु प्रत्यक्षात काहीच करत नसल्याने येथे अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट बघत आहेत का ? असा सवाल भाजप नेते सुनील गोगटे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाची ही कामे त्वरित सुधारून न दिल्यास व अपघातग्रस्त जागेवर सांगितलेली कामे त्वरित न केल्यास भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडेल व याची सर्वस्वी जबाबदारी रस्ते विकास महामंडळ व संबंधित ठेकेदार यांची असेल असा ईशारा भाजपच्या वतीने किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी पत्रव्यवहार करून दिला आहे.