शाळा सुरु करण्याचा अध्यादेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला मागे..

0
197

कोविड 19 च्या प्रभावामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळांतील इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने जो अध्यादेश जारी केला होता त्याला अवघ्या काही तासातच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जीआर मागे घेतला व सरकारच्या संकेत स्थळांवरून हटविण्यात आला असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली आहे.

कोरोना मुक्त भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यासाठीचा अध्यादेश शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तयार केला होता त्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच तो जाहीर करण्यात आला होता मात्र त्यात काही उणीवा असल्याने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच तो जी आर मागे घेतला आहे.त्याबाबतचा सुधारित जी आर लवकरच काढण्यात येईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.