if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव-कर्जत ( सुभाष सोनावणे)कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अनेक सेवा मंजूर झाल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे त्या अद्यापपर्यंत याठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत . सातत्याने दिरंगाईची ” व्हेंटिलेटर ” सेवा सुविधा ठेवून नागरिकांना त्रास देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे . म्हणूनच शासकीय अनास्था झटका , नाहीतर गाठ आमच्याशी आहे , असा इशारा कर्जत भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांनी देत मंजूर झालेले डायलिसिस सेंटर त्वरित सुरू करावे , अन्यथा नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे या गंभीर बाबीची दखल घेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असे क्रोध ईशारा यावेळी निवेदनाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आला.
कर्जत – खालापुर तालुक्यातील अनेक नागरिक शुगरच्या आजाराने पछाडलेले आहेत . हा आजार वाढलेल्या रुग्णांना नियमित डायलिसिस करण्यासाठी पनवेल , वाशी , बदलापूर , मुंबई अश्या विविध ठिकाणी जावे लागते. यामुळे आजारी रुग्णांना प्रवासाचा त्रास , खर्च याला सामोरे जावे लागते . कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरला मंजुरी मिळाली आहे , मात्र शासकीय यंत्रणा ” कान उपटल्या ” शिवाय जागी होत नाही , म्हणूनच ही गंभीर बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासकीय अनास्था झटकून डायलिसिस सेंटर त्वरित सुरू करावे , असे मागणी निवेदन पत्र देण्यात आले आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे कर्जत भाजपने राज्य शासनाकडे मागणी करून हे डायलिसिस सेंटर मंजुरीबाबत प्रयत्न केले आहेत , त्यास मंजुरी मिळाली असताना आता दिरंगाई का ? असा सवाल कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांनी उपस्थित करून जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दिरंगाई होत असून आतापर्यंत डायलिसिस सेंटर चालू झालेले नाही.
म्हणुनच जिल्हा आरोग्य प्रशासनाला जागे करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने भाजप नेते सुनील गोगटे यांच्या पुढाकारात उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ .मनोज बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना क्रोध आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी किसान मोर्चा कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुनिल गोगटे , सरचिटणीस प्रकाश पालकर , माजी शहर अध्यक्ष दिनेश सोलंकी , सोशल मीडिया सह संयोजक रायगड सूर्यकांत गुप्ता , सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे , युवा मोर्चा शहर चिटणीस सर्वेश गोगटे , विशाल सुर्वे , दर्पण घारे आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.यापूर्वी येथे चालू झालेली ब्लड स्टोअरेज बँक देखील शासकीय अनास्थेमुळे बंद झालेली असल्याने आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत संताप खदखदत आहे.