शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने साजरा केला वाढदिवस..

0
66

शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने साजरा केला वाढदिवस..

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या वाढदिवस शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने नुकताच साजरा करण्यात आला,खोपोलीतुन निघणाऱ्या आई एकविरा देवीच्या पालखीला त्यांचे नेहमी सहकार्य असते तर खोपोलितील गोर गरीब हाकेला धावून जात आहेत, तर त्यांच्या पत्नी खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका असून त्यांच्यकडे सार्वजनिक बांधकाम सभापती पदाची जबाबदारी आहे.


याची दखल शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने त्यांचा काल केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे, आतकरंगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ शेडगे, युवा नेते एकनाथ घाटे, नारायण हिरवे आदी उपस्थित होते,